Gadchiroli district highlights.13/12/2022
गडचिरोली नगर पालिकेचे माजी नगरसेवक इंजी. प्रमोद पीपरे यांच्या वाढदिवसा निमित्य आज अनेक सामाजिक कार्याचे आयोजन त्यांच्या चाहत्या लोकांकडून करण्यात आले होते.
वाढदिवसाला(birthday) सामाजिक कार्याचे महत्त्व असलेल्या आपल्या लोकप्रिय शैलीला पुढे नेत,प्रमोद पीपरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोट बुक,पेन,पेन्सिल, शाळेय ड्रेस,तसेच गोरगरिबांना आणि मतिमंद लोकांना स्वेटर,ब्लँकेट चे वाटप करण्यात आले आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना प्रमोद पीपरे यांनी शहरातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत राहण्याची हमी यावेळी जाहीर केली आहे.