गडचिरोली शहरात जनावरांमध्ये लंपी रोगाचा शिरकाव…

0
265

Gadchiroli district highlights.6/12/2022

गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन जवळ एका गाईच्या वासरू ला लंपी रोगाचा संसर्ग होण्याची धक्कादायक बाब काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

शहरातील काही गोरक्षकांनी(animal lovers) ताबडतोब पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देताच पशू वैद्यकीय यंत्रणा सक्रिय करून घटनास्थळी पोहोचले होते. लंपी झालेल्या वासरू वर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले असून,त्या वासरूला विलागिकरण करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात नगर पालिकेच्या वतीने कुठलीही मदत मिळाली नाही हे विशेष…

लंपी रोगाचा(lumpy disease) शिरकाव झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला,तसेच पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली असून,अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी नगर पालिकेला कळवतो असे सांगितले होते.

पशू वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरू केला असून त्या वासरुला विलगिकरण न केल्याने शहरातील जनावरांना लंपी बिमारीचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निषकाळजीपणा दाखविणाऱ्या नगर पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना ताबडतोब वठणीवर आणण्यासाठी काही गोरक्षक प्रयत्नशील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here