आज हा लेख वाचनात आला- आवडला म्हणुन तुमच्यासाठी शेअर केला.
” श्रद्धांजली “
काल रात्री पासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रध्दांजली वाहण्यात येत होती.
टाईम्स ग्रुपच्या न्यूज पोर्टलवर बातमी दिली गेली.नंतर ती बातमी निखालस खोटी असल्याचे सिद्ध झाले.
मी माझी पोस्ट पाच मिनिटांत उडवली.या निमित्ताने मीडियाची विश्वासार्हता पणाला लागली आहे.
राजकीय फेकाफेक तर दिवसातून कमीतकमी दोन वेळा होते.आता ती कोणत्या थराला पोचली आहे हे काल कळले. जे घडले आहे ते जसेच्या तसे लोकांपर्यंत पोचवणे हे बातमीदाराचे आद्य कर्तव्य आहे.हल्ली जे घडले नाही ते पोचविण्यात येते.
आज सकाळी एका कॉमेंटने माझी खूप छान करमणूक झाली.
“लोकसत्तेने पण ही बातमी दिल्यामुळे आम्ही विश्वास ठेवला.”
हसून हसून पुरेवाट झाली.
पूर्वी…..
“लोकसत्तेत आलंय ना म्हणजे नक्की खर असणार “
पण हल्ली …..
लोकसत्तेत आलय ना म्हणजे नक्की खोटं असणार “
अशी परिस्थिती आहे.
यात संपादक गिरीश कुबेर यांचा सिंहाचा वाटा आहे.आता ते सिंह आहेत की HMV चा 🐕🦺आहेत असा प्रश्न काहीजण उपस्थित करतील तो भाग वेगळा.
माझ्या परीने मी लोकसत्तेला कधीच श्रद्धांजली वाहून मोकळा झालोय.
लेखक: अज्ञात