Home राजकीय १२ फेब्रुवारीला गडचिरोलीत सीटूचे भव्य आंदोलन… जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो कंत्राटी कामगार...

१२ फेब्रुवारीला गडचिरोलीत सीटूचे भव्य आंदोलन… जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो कंत्राटी कामगार एकवटणार…

0
177

 

गडचिरोली :

केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी व शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात देशभरातून सुमारे ३० कोटींहून अधिक कामगार व शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात सीटू (CITU) च्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक कंत्राटी कामगार, असंघटित कामगार, शेतकरी व शेतमजूर सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अमोल मारकवार यांनी जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगार, शेतकरी व शेतमजुरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारच्या धोरणांचा निषेध करावा, असे आवाहन केले आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या…

कामगारांवर अन्याय करणाऱ्या चारही श्रमसंहिता तात्काळ रद्द करण्यात याव्यात.

असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान २६ हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे.

६० वर्षांवरील सर्व कामगार, शेतकरी व शेतमजुरांना ५,००० रुपये मासिक पेन्शन लागू करण्यात यावी.

या आंदोलनात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन परीचर कामगार, कंत्राटी कामगार तसेच शेतकरी व शेतमजूर यांच्या विविध संघटना सहभागी होणार आहेत.

 

या भव्य आंदोलनाचे नेतृत्व सीटू संघटनेचे कॉम्रेड रमेशचंद्र दहिवडे,कॉम्रेड जामदार,कॉम्रेड अमोल मारकवार,डॉ.धर्मराज सोरदेआणि राज बन्सोड करणार आहेत.

सीटूच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आला असून, कामगार व शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here