गडचिरोली | प्रतिनिधी
मा. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर वैद्यकीय कारणास्तव शस्त्रक्रिया करण्यात आल्याने सध्या ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे ते उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्या अंतिम दर्शन व अंत्यसंस्कार कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत.
या दुःखद प्रसंगी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पवार कुटुंबीयांप्रती तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, दिवंगत अजीतदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर, पुढील चार दिवसांनंतर ते बारामती येथे जाऊन पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार असून, प्रत्यक्ष श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांच्या अनुपस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातूनही सहवेदना व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या लवकर प्रकृतीसुधारणेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.




