Home ब्रेकिंग न्यूज अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्य शोकसागरात… गडचिरोलीत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन…

अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्य शोकसागरात… गडचिरोलीत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन…

0
277

 

गडचिरोली | ता. २८

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार (ता. २८) रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजकारणासह समाजकारणात आपल्या ठाम नेतृत्वशैलीने, प्रशासनिक कौशल्याने आणि जनतेशी असलेल्या थेट संवादामुळे अजितदादा पवार यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक अनुभवी, कणखर आणि प्रभावी नेतृत्व गमावले आहे.

या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सर्वपक्षीय शोकसभा गुरुवार (ता. २९) रोजी सायंकाळी ५ वाजता, गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक परिसरातील राजीव गांधी खुल्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेला सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केले आहे.

अजितदादा पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी गडचिरोलीत सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here