Gadchiroli. date 18/9/2022
MIT World Peace University च्या MIT School Of Government महाविद्यालयातर्फे यंदाच्या 12व्या भारतीय छात्र संसद या कार्यक्रमामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या कोठी गावाच्या विद्यमान सरपंच कु. भाग्यश्री लेखामी यांना ‘उच्च शिक्षित युवा सरपंच सम्मान’ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
MIT WPU ग्रुप चे अध्यक्ष Dr. विश्वनाथ कराड आणि executive डायरेक्टर राहुल कराड यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची सुरवात 2008 साला पासून झाली. दरवर्षी देशभरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विचारांची देवाणघेवाण करतात.
देशातील युवांना राजकीय क्षेत्रात आपली भूमिका ठामपणे मांडता यावी, त्यात अधिकाधिक प्रमाणात तरुण-तरुणींनी सहभागी व्हावं आणि या सहभागातून देशात कुशल आणि सक्षम युवा नेतृत्व तयार व्हावं अश्या अनेक राजकारणसंबंधी निगडित असलेल्या गोष्टींचा विचार करून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमामध्ये देशभरातील विद्यमान मंत्रीगण, आजी-माजी प्रशासकीय अधिकारी, जेष्ठ पत्रकार तसेच कला-साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखक व कलाकार यांना तत्कालीन राजकारण, देशातील विविध समस्या-प्रश्न अश्या विषयांवार त्यांचे विचारातून मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलं जातं. त्याचबरोबर संपूर्ण देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठातून विद्यार्थांना सुद्धा संबंधित विषयांवर बोलण्यासाठी, त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी खास संधी उपलब्ध करून दिली जाते. MIT SOG च्या प्राध्यापक प्रत्येक विषयासाठी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या भाषणाच्या विडिओ मधून 3 विद्यार्थ्यांची निवड करतात आणि त्यांना कार्यक्रमात मंचवरून आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली जाते.
केवळं भाषण-मार्गदर्शनच नाही तर या कार्यक्रमात दरवर्षी देशातील युवा आमदार, सरपंच आणि अध्यात्मिक गुरु यांना मानाचा पुरस्कार देऊन सन्मानीत केलं जाते. संपूर्ण देशातून युवा असलेलं विद्यमान आमदार आणि सरपंच यापैकी त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बाजवणारे आणि उच्च शिक्षित असलेलं 3 पुरस्कार्थिंची निवड करण्यात येते. यामध्ये यावर्षीच्या उच्च शिक्षित युवा सरपंच पुरस्कार साठी गडचिरोली जिल्ह्याच्या कु. भाग्यश्री लेखामी, जम्मु आणि काश्मीर राज्यातील राजोरी जिल्ह्यातून समरीन खान आणि पंजाब जालंदर जिल्ह्यातून कुलविंदर बाघा यांची निवड करण्यात आली. हरियाणा विधानसभाचे अध्यक्ष श्री. घ्यानचंद गुप्ता आणि उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय कार्यमंत्री श्री. सुरेश खन्ना यांच्या हस्ते या युवा सरपंचांना सन्मानीत करण्यात आले.
तीन दिवस चालणाऱ्या या युवकांच्या राजकीय मेळाव्यात देशभरातून आलेल्या आणि राजकारणात आपले भविष्य घडवू पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना युवा नेतृत्वाची देशाच्या राजकारणात असणारे महत्व, लोकशाहीशी असलेले नाते आणि एक सामान्य माणूस सुद्धा राजकारणातून देशाच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या आणि निर्णयाच्या भूमिकेत शिरू शिकतो, देश घडवू शकतो-चालवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करण्यास MIT WPU चा भारतीय छात्र संसद हा कार्यक्रम पूरक ठरतो.