Home राजकीय 27ऑक्टोबर ला काँग्रेस मेळाव्यात होणार मोठा पक्षप्रवेश…

27ऑक्टोबर ला काँग्रेस मेळाव्यात होणार मोठा पक्षप्रवेश…

0
328

 

गडचिरोली :: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जिल्हाभरात आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन करण्यासाठी 27 ऑक्टोबर 2025 रोजी गडचिरोली येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा जोमाने फडकविण्याचा निर्धार या कार्यक्रमाद्वारे दाखविण्यात येणार आहे.

या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, काँग्रेस विधिमंडळ गटनेते व आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम यांच्यासह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याद्वारे काँग्रेस पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रचार मोहिमेचा अधिकृत शुभारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या मेळाव्यात विविध पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, जिल्हा काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार आहे. हा कार्यक्रम पक्षासाठी एक मोठा “शक्तिप्रदर्शनाचा सोहळा” ठरणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ही माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत जेष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत कोवासे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, तसेच रमेश चौधरी, नंदू कायरकर, नंदू वाईलकर, प्रभाकर वासेकर, नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, हरबाजी मोरे, दत्तात्रेय खरवडे, उत्तम ठाकरे, लालाजी सातपुते, विजय राऊत, श्रीनिवास ताडपल्लीवार, दिनेश सिडाम, देवाजी सोनटक्के, धिवरू मेश्राम, राकेश रत्नावार, परमेश्वर गावडे, सुधीर मडावी, लक्ष्मण आतला, सुरज मडावी, नागोराव ऊईके, संतोष भांडेकर, स्वप्नील बेहरे, विपुल येलटिवार, गौरव येनप्रेड्डीवार, सौं. कल्पनाताई नंदेश्वर व सौं. कविताताई उराडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्ता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. नव्या चेहऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला स्थानिक स्तरावर बळकटी मिळेल, तसेच आगामी निवडणुकांसाठी पक्ष एकजुटीने सज्ज होत असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here