Home ब्रेकिंग न्यूज ब्रेक फेल एस टी बस फलाट ओलांडून घुसली प्रवाशांमध्ये…तीन जख्मी…युवा सेनेच्या नेत्यांनी...

ब्रेक फेल एस टी बस फलाट ओलांडून घुसली प्रवाशांमध्ये…तीन जख्मी…युवा सेनेच्या नेत्यांनी पोहविले रुग्णालयात.

0
1095
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: 0; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 153.0257;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 44;

 

गडचिरोली.गडचिरोली शहरातील एस टी डेपो मध्ये एक ब्रेक फेल झालेली बस अचानक पणे फलाट ओलांडून प्रवासाच्या गर्दीत घुसल्याने एक लहान मुला सह दोन महिला जखमी झाल्याची घटना दुपारी 2.15 सुमारास घडली.

 

या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता नेहमी प्रमाणे बस आगाराच्या दुरुस्ती विभागाची तपासणी झाल्यावर प्रत्येक बस ठरलेल्या मार्गांवर पाठविल्या जाते,परंतु आज दुपारी ह्या बसची कुठलीही तांत्रीक तपासणी न करताच, आरमोरी देलोडा या मार्गावर बस लावली पाठविण्याच्या बेताने एस टी बस चे चालक बस ला फलाट वर लावण्याचा प्रयत्न करीत असताना बस चे ब्रेक अचानक फेल झाले आणि बस उभ्या असलेल्या प्रवासाच्या गर्दीत जाऊन घुसली होती.

या घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला देण्यात आली होती परंतु नेहमी प्रमाणे पोलिस यंत्रणा वेळेवर पोहचलेली नव्हती पण घटनेची माहिती मिळताच लगेच शिवसेना उबाठा गटाचे युवा नेते पवन गेडाम आणि तालुका प्रमुख कुणाल कोळे व शहर प्रमुख पप्पू शेख ताबडतोब हे घटनास्थळी येऊन तिन्ही जखमींना आपल्या खाजगी वाहनाने रुग्णालयात दाखल केले होते विशेष…

 

जखमी झालेल्या तिन्ही रुग्णांना युवासेनेच्या नेत्यांनी आपल्या खाजगी वाहनाने रुग्णालयात दाखल केल्या नंतर रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर देशक सहारे यांनी कार्तिक नावाच्या सफाई कामगाराला रुग्णाच्या जखमेवर टाके लावायला लावल्याचे पराक्रम आज सामान्य रुग्णालयात पहावयास मिळाले.

या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांचे नाव निर्मला शंकर बाबनवाडे वय 52 वर्ष राहणार विहिरगाव, अवीत अंकुश बाबनवाडे वय 3 वर्ष राहणार विहिरगाव,तृप्ती प्रमोद चाणेकर वय 14 वर्ष चांभार्डा तहसील जिल्हा गडचिरोली असून तिघांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.

ब्रेक फेल झालेल्या एस टी चालकाचे नाव बंडू खांडरे वय 56 वर्ष राहणार गडचिरोली यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून,तपासणीत आलेल्या अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एस टी डेपो प्रबंधक अतुल रामटेके यांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर एक तासापर्यंत ते घटनास्थळी आले नव्हते तसेच युवा सेनेच्या नेत्यांनी त्यांना फोन केला असता मला शासकीय काम महत्वाचे आहे नंतर घरी परत जातांना मी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची माहिती घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here