देवेंद्र जी तुमच्या जिल्ह्यात गोमांस विक्री होत आहे…थोडासा लक्ष घालता काय…?? कसायांना पोलिसांची भीतीच नाही….तीन महिन्यात आज दुसऱ्यांदा गुन्हा दाखल.

0
670

 

 

गडचिरोली शहरात इंदिरा नगर येथे गोमांस विक्री करतांना एक मुस्लिम व्यक्ती आणि त्याच्या पत्नी सह दोन मुलांनी गोमांस विक्री करीत असल्याची माहिती मिळाली असता ताबडतोब सर्व बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद व शिवसेनेच्या लोकांनी धाड टाकून रंगेहाथ 25 किलो गोमांस सह पकडले. लगेच पोलिसांना सूचना देण्यात आली होती.गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर गोमांस जप्त करण्यासाठी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.आभा गजभिये यांनी पोलिसांच्या समक्ष पंचनामा करून गोमांसाचे नमुने चार प्लास्टिक च्या डब्यात भरून घेतल्यानंतर उर्वरित 25 किलो गोमांस नष्ट करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर असे आढळले की या ठिकाणी वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वीज विभागाची वीज जोडणी घेऊन विटा बनवणाऱ्या कारखान्यात गोमांस विक्री करण्यात येत होते. या आरोपींवर मागील तीन महिन्यापूर्वीच याच ठिकाणी गोमांस विक्री करतांना रंगेहाथ पकडण्यात आले होते तरीही काही भ्रष्ट लोकांच्या मदतीने गुन्ह्याचे स्वरूप कमी करून न्यायालयातून जमानत मिळत असल्याचे चित्र वारंवार समोर येत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर हिंदुवादी संघटनेच्या वतीने शंका उपस्थित केली जात आहे.

गोमांस विक्री करतांना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर आज त्या ठिकाणी गोमांस आणण्यासाठी वापर करण्यात येत असलेले चारचाकी मारुती Ritz वाहन क्रंमांक MH 31 DV 1533 सुद्धा जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी धाड टाकताच या ठिकाणी कोणत्यातरी खबऱ्याने आरोपींना सचेत केले असल्याने आरोपी नौशाद अब्बास कुरेशी,रेहान नौशाद कुरेशी नावाचे दोन व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेल्याचे आरोप हिंदू वादी संघटनेच्या लोकांनी लावले होते.घटनास्थळ वरून आहान नौशाद कुरेशी याला चार हजार रुपयांची रक्कम आणि त्या ठिकाणी अडलेल्या cctv चे dbr हार्डिस्क सह अटक करण्यात आली असून फरार दोन्ही आरोपींना ताबडतोब अटक करून तिन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या आरोपींवर गोमांस विक्री केल्याचे गुन्हे वारंवार घडत असून या आरोपींना ताबडतोब हद्दपार करण्याची मागणी शिवसेना,बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे नेत्यांनी केली असून या पुढे हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या प्रयत्न करून गोमांस विक्री करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा हिंदू वादी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात येत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here