सूरजागड चे लोहदगड, रेपनपली जवळ खड्डयात टाकले..

0
295

 

 माजी.जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सुरजागड खदानीच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केले..!!

 

एटापली तालुक्यातील सूरजागड येतील लोहखनिज घेवुन दररोज मोठमोठे ट्रक वाहतूक करीत असल्याने आलापली-आष्टी रस्त्यावर मोठ्या संख्येने खड्डे पडून वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे.

तसेच आलापली सिरोंचा मार्गांनी सुध्दा सदर वाहतूक सुरू असून काल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे दामरंचा गावाला जात असताना रेपनपली जवळ ट्रक खड्डयात अडकलेला दिसून आला, तेंव्हा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वतः जेसीपी बोलून लोहखनिज घेवून जाणाऱ्या ट्रक मधील लोहदगड सदर रस्त्यावरील खड्डयात टाकुण मार्ग मोकळा करण्याकरीता मदत केली.

यावेळेस माजी प.स.सभापती भाष्कर तलांडे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आलापल्ली येथील प्रतिस्ठीत नागरिक अग्रवाल भय्या व इतर नागरिक उपस्थीत होते..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here