विधानसभेच्या निवडणुकीत भाजप कडून डॉ.नामदेव उसेंडी प्रबळ दावेदार…

0
1106

 

गडचिरोली विधान सभा निवडणुकीसाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघात भाजप कडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत वर्तमान आमदार डॉक्टर देवराव होळी,पूर्व खासदार अशोक नेते, डॉ.नामदेव उसेंडी, डॉ.मिलिंद नरोटे,डॉ.नितीन कोडवते दाम्पत्य, यांनी भाजप कडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार आहे अशी अपेक्षा नक्कीच बाळगलेली आहे. इच्छुकांची संख्या वाढत असली तरी डॉ. देवराव होळी नंतर नामदेव उसेंडी यांची गडचिरोली विधानसभा क्षेत्रावर दावेदारी मजबूत आहे. डॉ.उसेंडी यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. त्यांनी मतदार संघात गेल्या दहा वर्षापासुन सात्यत्याने जनसंपर्क ठेवला असून एक अनुभवी डॉक्टर,आणि उच्च शिक्षित चेहरा म्हणून त्यांच्या नावावर मतदार संघात अनुकुलता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी व्हावी या उद्देशाने डॉ.नामदेव उसेंडी यांचा योग्य तो वापर भाजप ला करता आला नसल्याने, आता तरी ते भाजप कडून प्रभावी उमेदवार ठरू शकतात.

डॉ उसेंडी यांनी  स्वतः गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे दोनदा प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे या मतदार संघात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, याचा फायदा भाजप ला मिळण्याची जास्त शक्यता आहे.डॉ.नामदेव उसेंडी यांना पक्षात प्रवेश देतांना भाजपच्या वतीने केलेला प्रॉमिस पुरा केला जाईल अशी अपेक्षा उसेंडी यांना आहेच,यापलीकडे आरएसएस लॉबी ने लोकसभेचा उमेदवार म्हणून अचानकपणें ऐनवेळी डॉ.मिलिंद नरोटे यांचा सुध्दा नाव मोठ्या अपेक्षेने चालविला होता पण त्यांना सफलता मिळाली नाही. आताही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आरएसएस कडून नरोटे यांच्याच नावाची मागणी होईल यात मुळीच शंका नाही.पण डॉक्टरकीतून आलेला व्यक्ती आणि रमलेला मुसद्दी राजकारणी यात मोठा फरक आहे.राजनीतिक अनुभव नसलेला नवीन चेहरा देताना मोठी रिस्क नको असे मत यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केल्या जात आहे.अशा वेळी विनाकारण रिस्क घेत जागा गमावण्या पेक्षा डॉ.नामदेव उसेंडी यांच्या सारख्या अनुभवी आणि कुशल संघटक व्यक्तीला उमेदवारी देणे कधीही भाजप ला परवडेल, त्यामुळे या मतदार संघात भाजप कडून डॉ.नामदेव उसेंडी हेच प्रबळ दावेदार व प्रभावी उमेदवार ठरू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here