शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा…

0
91

 

 

गडचिरोली:शिवसेना महिला आघडी गडचिरोली च्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढ दिवस जिल्हा माहीला संघटीका तथा गडचिरोली जिल्हा परिषद च्या माजी बांधकाम सभापती छाया ताई कुंभारे यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. गेल्या काही दिवसा पासून गडचिरोली जिल्हात सतत पाऊस येत आहे आज ही सकाळ पासून गडचिरोलीत मुसळ धार पाऊस येत होता परंतु शिवसैनिकाचे दैवत, मराठी माणसाचा आवाज, गोर गरीब जनतेचे शेतकरी शेतमजुरांचे कैवारी, पक्ष प्रमुख, शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढ दिवसाच्या निमित्याने सर्व प्रथम जिल्हा महिला रुग्णालय येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिला रुग्णांना व नातेवाईकांना भोजन दान देण्यात आले तसेच फळ ही वाटप करण्यात आले शेतीच्या कामावर जाणाऱ्या गरीब महिलांना पाउसा पासून बचाव साठी मेनकापळ वाटप करण्यात आले .या नंतर शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो या साठी सर्व महिला शिवसैनिकानी प्रार्थना केली.  या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित शिवसेना महिला जिल्हा संघटीका माजी बांधकाम सभापती छाया ताई कुंभारे , सूनंदा ताई आतला उप जिल्हा संघटीका माजी जी. प.सदस्य ,गडचिरोली शहर प्रमुख शीतलताई ठवरे,मंगला ताई भटलवार समवण्यक गडचिरोली – धानोरा, गीता ताई मेश्राम तालुका समन्वयक ,गीता ताई सोनुवने शाखा संघटीका ,सीमा ताई पराशर शाखा संघटीका ,धनश्री ताई पवार शाखा संघटीका ,स्वाती ताई जपंलवार उप शाखा संघटीका ,शारदा वणकर ,छंबुताई सावरबांधे शाखा संघटीका ,वीणा निंबेकर शाखा संघटीका ,कल्पना ताई साखरे शाखा संघटीका, भरती ताई शाखा प्रमुख ,शेकडो महिलाशिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here