गडचिरोली: विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेय देवस्थान दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी हजारो भाविक नागरिकांनी जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला चेतावणी वजा विनंती केली आहे.
सदर मोर्चा चे नेतृत्व सुनील शास्त्री महाराज, हरणघाट चे मुरलीधर गुज्जनवार महाराज,चंद्रपूर चे विख्यात भागवताचार्य मनीष भाई,यांनी केले होते, मार्कंडेय देवस्थान ची दुरुस्ती मागील आठ वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे त्या परिसरातील नागरिक तथा भाविक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झालेला होता.
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या वतीने आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन साधू संतांसह जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या उपस्थितीत भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून येणाऱ्या पंधरा दिवसात मंदिराचे बांधकाम चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
मार्कंडेय देवस्थान ची दुरुस्ती कामात देवस्थान च्या विश्वस्त मंडळाने सुध्दा दुर्लक्ष केला असल्याचा आरोप भाविकांनी आज आंदोलन स्थळी झालेल्या जाहीर सभेत लावलेला आहे. चामोर्शि तालुक्यातील नागरिकांनी मार्कंडेय देवस्थान चे विश्वस्त मंडळ बरखास्त करून जिल्हाधिाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची विनंती या प्रसंगी केली होती हे विशेष…