धुळे.२९ जानेवारी.
सदाशिव नगर मधील , “नेहमीच
पवित्र” असणार्या “सदाशिव
महादेव ” मंदिराचे बांधकाम आपल्या सर्वांच्या योगदानातून पुर्ण झाले आहे.
मंदिराची रंग- रंगोटी झाली, गाभार्यात ग्रेनाईड बसविले गेले. तळाला टाईल्स लावल्या गेल्यात, मंदिरा भोवती भरभक्कम, आकर्षक संरक्षण भिंत बाधले गेली आणि सुसज्ज लोखंडी गेट बसविले गेले, मंदिरासमोर , लख्ख प्रकाशमान हायमेक्स बसविले गेला, मंदिरात, पंख्यांची व्यवस्था झाली,बसण्यासाठी सुंदर बाकांची व्यवस्था झाली, इंदोरहून शिवलिंग, नंदी आणि कांसव आणले गेले, दात्याकडून सुंदर त्रिशुळ, नागाची प्रतिक्रुती, घंटा, शिवलिंगावर पाणी सोडण्याच्या घागरीची व्यवस्था झाली आहे. सुमारे बत्तीसलाख रुपये खर्चाचा , आपल्या सर्वांच्या जीवा भावाचा हा प्रकल्प , आपल्या सर्वांच्या योगदानातून परिपूर्ण झाला.
आता , आपल्या सर्वांना भगवंताच्या प्रतिष्ठापनेची प्रतिक्षा आहे. त्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले असून , उत्तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वाचस्पती, ज्योतिषाचार्य श्री.एकनाथ भावे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली , अकरा ब्राम्हणांच्या सहयोगातून, दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी, मंदिर व मंदिर परिसराच्या शुद्धीकरणाची दोन तासांची विधीवत पुजा होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता, भगवंताची अर्थात , शिवलिंग, नंदी, कांसव,त्रिशुळ , आदिंची शोभा यात्रा , स्वामी नारायण मंदिरापासून, सदाशिव नगरातील गणपती मंदिर, विद्या नगरीतील , स्वामी समर्थ मंदिर, श्रीकृष्ण मंदिर , दत्तमंदिर चौकातील दत्त मंदिर,गाडगे बाबा सोसायटी मार्गे, दत्त कालनीतील गणपती मंदिर, संतसेना नगर, ऑडिटर कालनी , आणि शेवटी सदाशिव नगर अशी सवाद्य शोभा यात्रा काढली जाणार आहे.
या शोभा यात्रा दरम्यानच्या मार्गातील माता भगिनींनी , भगवंताच्या स्वागता प्रित्यर्थ अंगणात सडा सारवण करण्याची, रांगोळ्याकाढण्याची ,गुढ्या तोरणं उभारण्याची, पणत्या लावण्याची व भगवंतांचे औक्षण करण्याची विनंती आहे.
त्याच प्रमाणे शोभा यात्रा, नयनरम्य, आकर्षक होण्यासाठी भगिनी वर्गाने डोक्यावर मंगल कलश घेण्याची आणि शोभायात्रेत, विविध वेशभूषा केलेल्या अबाल व्रूद्ध श्रद्धावंतानी सहभाग घेण्याची विनंती आहे.
दिनांक एक मार्च ते तीन मार्च दरम्यान रोज दिवसभर, होम हवन, यज्ञा सह विधीवत पुजा संपन्न होणार आहे. या पुजेचा सपत्नीक लाभ घेऊ ईच्छीणार्या भाविकांनी खर्चापोटी किमान अकराशे रूपये शुल्क देण्याची अपेक्षा आहे.
तीन दिवसांच्या विधीवत पुजा नंतर मंदिर परिसरातच महा प्रसाद वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
चार दिवसाच्या पूजा अर्चा साठी,होम हवनासाठी, महाप्रसादा साठी , प्रचारासाठी, होणारा खर्च मोठा आहे. त्यासाठी भगवंताचे दूत म्हणून, सर्वश्री जितेंद्र शिंदे, ताराचंद माळी गुरुजी, सुहास ओगले, प्रविण, सोनावणे, विलास कुलकर्णी, मिलींद भामरे, गिरीधर भामरे, लक्ष्मीकांत गिते, शामकांत पवार,मनिलाल पाटील गुरुजी, सचिन काळे,सचिन ठाकरे, रावसाहेब बोरसे, आदी मान्यवर आपल्या भेटीला येणार आहेत , कृपया यथाशक्ती आर्थिक सहयोग देऊन या पवित्र कर्माच पुण्य प्राप्त करुन घ्यावे अशी विनम्र विनंती आहे.
बाहेर गावचे श्रद्धावंत, हित चिंतक, संग सोयरे, मित्रश्री. जितेंद्र शिंदे यांच्या.7020224260 या फोन क्रमांकावर
फोन पे द्वारे आर्थिक सहयोग करण्याची विनंती महेश बाबा घुगे अध्यक्ष सदाशिव महादेव मंदिर बांधकाम समिती, धुळे यांनी केली आहे.