गडचिरोली:गडचिरोली एमआयडीसी परिसरात श्री साई सिमेंट विटा उद्योगाचे प्रमुख मलिक बुधवानी यांनी दाखल केलेल्या चेक बाउन्स प्रकरणात मनोज खुणे यांना एक महिन्याची शिक्षा आणि दुप्पट रक्कम देण्याचे न्यायालयाचे आदेश गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालय प्रथम श्रेणी गडचिरोली यांनी दिनांक 22.11.2023 रोजी पारित केले.
मनोज खुणे रा.देऊळगाव तहसील कुरखेडा यांना चेक बाउन्स प्रकरणात एक महिन्याची शिक्षा सुनावलेली असून थकीत रक्कम दुप्पट परत करण्याचे आदेश निर्गमित केल्याने मल्लिक बुधवानी यांनी गडचिरोली न्यायालयाचे आभार मानले आहेत.
सविस्तर प्रकरण असे की गडचिरोली एमआयडीसी परिसरातील श्री साई सिमेंट उद्योग चे संचालक मलिक बुधवानी यांच्याकडून मनोज खुणे रा.देऊळगाव तहसील कुरखेडा यांनी 2 लाख 35 हजार रुपयांच्या सिमेंट विटा विकत घेऊन सदर रकमेचा धनादेश दिला होता, मिळालेला धनादेश मलिक बुधवारी यांनी बँकेत टाकला असता मनोज खुणे यांच्या खात्यात रक्कम नसल्याच्या अहवालासह,मनोज खुणे यांनी दिलेला चेक हा बाऊन्स झाल्या मुळे मलिक बुधवानी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय प्रथम श्रेणी गडचिरोली यांच्याकडे मनोज खुणे यांच्या विरुद्ध सदर रक्कम मिळवण्यासाठी दावा दाखल केला होता.
सदर प्रकरणाची सुनावणी होऊन प्रकरणातील संबंधित पुरावे तपासणी झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रथम श्रेणी न्यायालयाने मनोज खुणे यांना एक महिना साधारण करावासा ची शिक्षेचा आणि मलिक बुधवारी यांची थकीत असलेली रक्कम, 2 लाख 35 हजार रुपयाचे दुप्पट म्हणजे 4 लाख 70 हजार रुपये देण्याचे आदेश दिलेला आहे.
सदर न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशावरून श्री साई सिमेंट विटा उद्योगचे प्रोप्रायटर मल्लिक बुधवानी यांना विचारणा केली असता त्यांनी गडचिरोली प्रथम सत्र न्यायालयाकडून मला योग्य असा न्याय मिळाला आहे अशी भावना आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केलेली आहे.