Home भ्रष्टाचार सावधान…….या मार्गावरचा प्रवास ढकलू शकतो तुम्हाला मृत्यूच्या दाढेत …

सावधान…….या मार्गावरचा प्रवास ढकलू शकतो तुम्हाला मृत्यूच्या दाढेत …

0
463

 

उघडा डोळे.. बघा नीट

चमोर्शी, आष्टी:

गडचिरोली अणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावरुन प्रवास करणे नागरिकांसाठी जीवघेणा ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. हा पूल जीर्ण झाला असून या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातल्या त्यात हा पुल अरुंद त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक… पुरामुळे खड्ड्यांची खोली वाढतच असून खड्ड्यांमुळे थोडा जरी तोल गेला तर सरळ नदीत पडण्याचा धोका. या पुलावरील जीवघेणे खड्डे बुजवा अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली. पण शासन आपल्या दारी चा ढीडोंरा पिटविणाऱ्या सरकारचे प्रशासन अणि लोकप्रतिनिधी मात्र याकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाहीं. शेवटीं नागरिकांना जीवघेणा प्रवास या मार्गावरून केल्याशिवाय पर्याय नाही. घरून या मार्गावर प्रवास करण्यासाठी निघालेल्याना परत घरी पोहोचू याची कोणतीही शाश्वती उरली नाही.

श्री संजय भोयर यांच्या लेखनीतून…

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here