भाजप च्या बाजूने राजकीय वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार…प्रशांत वाघरे.
गडचिरोली.मागील नऊ वर्षाची परंपरा बघता पुढे येणाऱ्या काळात निवडणुकीत भाजप ला एक तर्फी विजय मिळवून देण्यासाठी सध्या तरी राजकीय वातावरण तयार करणे अवघड जाणार असल्याची परिस्थिती अनेक जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
मागील वर्षी विनोद तावडे समितीने महाराष्ट्रात भाजप कमकुवत होत असल्याचा अहवाल दिल्यानंतर आता अनेक ठिकाणी जिल्हाध्यक्ष पदावर जातीचा गणित जुळवून निवडणुकीत यश कसे मिळवता येईल याची चाचपणी भाजप ने केल्याचे दिसून येत आहे.
राज्यातून 25 जिल्हाध्यक्ष बदलवून भाजप ने आपल्या पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना नाराज न करता राजकीय वातावरण आपल्या बाजूने कसे मिळवता येईल याची खात्री करून घेतली असून पुढची पायरी चढत आज गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदावर भाजप चे युवा नेते व महामंत्री प्रशांत वाघरे यांची नियुक्ती केली आहे.या नियुक्ती ने ओबीसी समाज तथा भाजप च्या युवा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.येणाऱ्या काळात प्रशांत वाघरे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रत्येक गावात भाजप च्या बाजूने वातावरण निर्माण करून आपल्या कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
जाहिरात…
दिनांक.२१जुलै २०२३
आमदार कृष्णा गजबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन…
जाहिरात
दिनांक..25 जुलै.
सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन..