गडचिरोली. गडचिरोली शहरातील शिवाजी हायस्कूल येथे १०व्या वर्गात शिकणारी कू.देवयानी मनोहरसिंह पवार हिने आज आपला वाढदिवस मूकबधिर विद्यालयातील बाळगोपालांसह साजरा केला.
आजच्या काळात वाढदिवस साजरा करतांना अनेक ठिकाणी विनाकारण फालतू खर्च केला जातो,परंतु पवार कुटुंबाने एक सामाजिक मानसिकता ठेऊन आज आपल्या लाडक्या मुलीचा वाढदिवस दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सानिध्यात राहून साजरा केला होता. वाढदिवसा निमित्त देवयानीच्या आजी बेबीबाई पवार आणि आई वडिलांबरोबर तिच्या शाळेच्या शिक्षकांनी सुध्दा खूप आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे आणि मसाला भाताचे वाटप करण्यात आले होते.या प्रसंगी मनोहर सिंह पवार,दिपाली पवार,कीर्ती पवार,योगेश कोडापे उपस्थित होते.