शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री जिल्हा दौऱ्यावर

0
195

 

गडचिरोली,दि.08: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी 11.00 वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रमास एम.आय.डी.सी. मैदान कोटगुल रोड, गडचिरोली येथे उपस्थित राहणार तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत), गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा (व्ही.सी.द्वारे) होणार आहे.

त्यानंतर शासन आपल्या दारी या कार्यक्रमास मुख्यमंत्री यांचे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य, सुधाकर अडबाले, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, विधानसभा सदस्य देवराव होळी, विधानसभा सदस्य कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त , नागपूर विभाग, विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली नागपूर परिक्षेत्र, संदीप पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here