गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात 36 लाखाचा अंधार..गेंड्याची कातडी पांघरून झोपलेली नगर पालिका केंव्हा जागणार….

0
258

Gadchiroli district highlights 19.6.2023

महामार्ग विभाग आणि नगर पालिकेत समन्वय रहावा यासाठी आवश्यक उपाय योजना करणे गरजेचे…

गडचिरोली.शहरात विकासात्मक कामाकरीता करोडो रुपयांचा निधी सरकारच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात आवश्यकतेनुसार मिळत असते,पण मिळालेल्या निधीचा पुरेपुर दुरुपयोग झाल्यास होणारा नुकसान कसा भरून काढायचा हा विचार कधीही प्रशासन करीत नसेलच यात काही शंकाच नाही.

अशा परिस्थितीचे उत्तम उदाहरण म्हणजे गडचिरोली नगर पालिका,गडचिरोली नगर पालिकेचे संपूर्ण कारभार मागील दोन वर्षापासून प्रशासकाच्या वतीने चालू आहे.अधिकाऱ्यांनी विकासात्मक दूरदृष्टी ठेवून काम करायचे असेल तर हा कार्यकाल खूप महत्वाचा आहे,पण काम करण्याची इच्छा च नसेल त्यांचा काहीच फायदा होत नाही.हीच गोष्ट गडचिरोली शहरात इंदिरा गांधी चौकात तय्यार झालेल्या आदिवासी संस्कृती झळकविणारा 36 लाखाचा फायबर आर्ट वर्क च्या कामात दिसून आली आहे.

 

जिल्हा मुख्यालयी शहरातील इंदिरा गांधी चाैकातील हायमास्टसह चंद्रपूर, चामोर्शी आणि आरमोरी या मार्गांवरील पथदिवे गेल्या दाेन दिवसांपासून रात्रीच्या सुमारास बंद राहत असल्याने अंधाराचे साम्राज्य राहत आहे. सदर मुख्य चाैक व मुख्य मार्गावर सायंकाळी व रात्रीच्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनांची माेठी वर्दळ राहते. येथील दिवे बंद राहत असल्याने या मार्गावर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्या ठिकाणी 36लाख रुपये किंमतीची आणि भव्यदिव्य देखाव्याची वास्तू लावली, त्या ठिकाणची जागा नेहमी प्रकाशमान राहावी याची मुळीच शंका नाही पण गडचिरोली शहरात उभारलेली आदिवासी संस्कृतीचे प्रतिबिंब असलेली वास्तू ही अंधारात ठेवली जात असेल तर यासारखी दुसरी लाजिरवाणी बाब गडचिरोली नगर पलिकेसाठी असूच शकत नाही.

36 लाख रुपये खर्च करून उभारलेली वास्तू जर नेहमी अंधारात राहणार असेल तर कलेक्टर साहेबांनी ताबडतोब नगर पालिकेच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येत आहे. 

या सर्व कामाची माहिती नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारली असता,सदर कामाची निविदा नगर पालिकेच्या वतीने काढलेली असून,त्याची देखरेख करण्याची जबाबदारी पण आमचीच आहे,यापुढे या आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या भव्य दिव्य वास्तू अंधारात ठेवली जाणार नाही अशी ग्वाही नगर पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here