चांदाळ्याच्या आश्रमशाळेत मतदारांचा जमविला मेळा… गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत घोडेबाजाराला उत : प्रशासनाची डोळे झाक

0
370

Gadchiroli district highlights..27/4/2023

सत्ताधाऱ्यांची प्रशासनावर दादागिरी….

गडचिरोली : गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी एका गटाच्या नेत्याने चांदाळा येथील आश्रम शाळेत शेकडो मतदारांची जमवाजमव केली आहे. या प्रकारामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार तेजीत आला असून मतदारांनी दारु आणि मटनावर ताव मारायला सुरुवात केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गडचिरोली पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष चालविले असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे.

आज शेवटच्या दिवशी गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील तीनही गटांमध्ये मोठी चढाओढ दिसून येत असून दोन ते अडीच हजार रुपये दर प्रती मताला पोहचला आहे. प्रशासनाच्या डोळेझाकीमुळे पहाटेपर्यंत हा दर पाच हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here