Home सामाजिक  सौ. लीलादेवी राठी यांचे दुःखद निधन, आज होणार अंत्यसंस्कार

 सौ. लीलादेवी राठी यांचे दुःखद निधन, आज होणार अंत्यसंस्कार

0
170

 

गडचिरोली : शहरातील प्रतिष्ठित नागरिक बजरंग लाल राठी यांच्या पत्नी तसेच ‘महेश स्पोर्ट्स’चे संचालक हीरानंद राठी यांच्या मातोश्री सौ. लीलादेवी राठी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच गडचिरोली शहरात शोकसागर पसरला असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सौ. लीलादेवी राठी या अत्यंत साध्या, प्रेमळ आणि समंजस स्वभावामुळे सर्वांच्या परिचयाच्या होत्या. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एकत्र ठेवण्याची त्यांची जिव्हाळ्याची वृत्ती आणि समाजाशी असलेले स्नेहपूर्ण संबंध यामुळे त्यांनी सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने केवळ राठी कुटुंबालाच नव्हे, तर शहरातील सामाजिक व व्यापारी क्षेत्रालाही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. कुटुंबासाठी त्या आधारवडासारख्या होत्या. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आज त्यांच्या पार्थिवावर कठाणी नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंतिम यात्रा दुपारी ४ वाजता पोलिस स्टेशन मागील त्यांच्या निवासस्थानातून निघणार असून, अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सौ. लीलादेवी राठी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here