Home ब्रेकिंग न्यूज प्रभाग क्रमांक ६ मधून रमेश चौधरी यांचा ऐतिहासिक विजय गडचिरोली नगरपरिषदेत...

प्रभाग क्रमांक ६ मधून रमेश चौधरी यांचा ऐतिहासिक विजय गडचिरोली नगरपरिषदेत पाचव्यांदा प्रतिनिधित्व करणारे एकमेव नगरसेवक…

0
409

 

गडचिरोली, प्रतिनिधी :

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून रमेश चौधरी यांनी पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह त्यांनी नगरपरिषदेत सलग पाचव्यांदा प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला असून, गडचिरोली नगरपरिषदेत पाच वेळा निवडून येणारे ते एकमेव नगरसेवक ठरले आहेत.

याआधी सलग चार वेळा निवडून आलेले रमेश भाऊ चौधरी हे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरले होते. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील निकालाकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले होते. मतदारांनी त्यांच्या कार्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा विजयाची संधी दिली.

सन 2001, 2006, 2011, 2016 आणि 2025 या पाचही नगरपरिषद निवडणुकांमध्ये रमेश चौधरी यांनी सातत्याने विजय संपादन केला आहे. त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी शिवसेना, युवाशक्ती आणि राष्ट्रीय समाज पक्ष या विविध पक्षांतून निवडणुका लढविल्या असून, सध्या ते काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

सदैव जनसेवेसाठी तत्पर, सर्वसामान्यांशी थेट संपर्क ठेवणारे आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून रमेश चौधरी यांची गडचिरोली शहरात ओळख आहे. पाचव्यांदा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकत त्यांनी नगरपरिषद सभागृहात सर्वांत अनुभवी सदस्य म्हणून आपला प्रवेश निश्चित केला आहे.

या ऐतिहासिक विजयामुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात शहराच्या विकासासाठी त्यांचा अनुभव आणि नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here