Home शैक्षणिक जर्मनीतील नागरिकांची अहेरीतील भगवंतराव हायस्कूलला सदिच्छा भेट… तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास आंतरराष्ट्रीय...

जर्मनीतील नागरिकांची अहेरीतील भगवंतराव हायस्कूलला सदिच्छा भेट… तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव…

0
123

 

अहेरी : भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास जर्मनी येथील नागरिक रेहानंद ब्रेमर व मिलेना ब्रेमर यांनी सदिच्छा भेट देत उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे या विज्ञान प्रदर्शनाची शोभा अधिकच वाढली.

या प्रसंगी शाळेचे प्राचार्य  शाहिद शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवर अतिथींचे मनःपूर्वक स्वागत केले. प्रदर्शनादरम्यान अतिथींनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध विज्ञान विषयांवरील प्रकल्प, मॉडेल्स, प्रयोग तसेच नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सखोल निरीक्षण केले.

विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी, संशोधनाची आवड, सर्जनशीलता व प्रभावी सादरीकरण पाहून जर्मनीतील नागरिक अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करत असे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी विकसित करण्यास, संशोधन प्रवृत्तीला चालना देण्यास तसेच नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यास अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.

जर्मनीतील नागरिकांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून त्यांच्या शैक्षणिक व वैज्ञानिक प्रवासाला नवी दिशा व प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून आले. तालुकास्तरावर आयोजित या विज्ञान प्रदर्शनास मिळालेली आंतरराष्ट्रीय दखल अहेरीसाठी अभिमानास्पद ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here