Home विशेष अमेरिकेतील लुसियाना विद्यापीठाकडून काशिनाथ भडके यांना मानद डॉक्टरेट; गडचिरोली जिल्हा काँग्रेसतर्फे भव्य...

अमेरिकेतील लुसियाना विद्यापीठाकडून काशिनाथ भडके यांना मानद डॉक्टरेट; गडचिरोली जिल्हा काँग्रेसतर्फे भव्य सत्कार…

0
181

 

गडचिरोली :

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आणि माजी बीडीओ काशिनाथ भडके यांना समाजकारण, लोकविकास, ग्रामीण बांधणी व प्रशासन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अमेरिकेतील लुसियाना विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी बहाल करून गौरविले आहे. या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे जिल्ह्याचा मान आणखी उंचावला असून काँग्रेस कमिटीच्या वतीने भडके यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला.

 

काही दशकांपासून विविध सामाजिक उपक्रम, पर्यावरण-जागृती, शिक्षण प्रोत्साहन, आदिवासी व वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या भडके यांच्या कामाचा परदेशातही गौरव होत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

 

सत्कार समारंभात काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी भडके यांच्या कार्याचा गौरव करताना, “गडचिरोलीच्या विकासात काशिनाथ भडके यांचे योगदान अनमोल असून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणजे जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचाही सन्मान आहे,” अशी भावना व्यक्त केली.

 

कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे, गडचिरोली विधानसभा निरीक्षक संदेशजी सिंगलकर, माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, माजी जि.प. सदस्य अॅड. रामभाऊ मेश्राम, काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कविताताई पोरेड्डीवार, शहराध्यक्ष सतीश विधाते यांसह अनेक पदाधिकारी, महिला नेते व मान्यवरांची उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाला उपस्थित नागरिक, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींनी भडके यांना मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here