Home राजकीय प्रभाग ७ मध्ये सुवर्णा पवार यांची जोरदार चर्चा; ‘माणुसकीचा घास’ उपक्रमाचा विश्वसनीय...

प्रभाग ७ मध्ये सुवर्णा पवार यांची जोरदार चर्चा; ‘माणुसकीचा घास’ उपक्रमाचा विश्वसनीय आधार, आता घडी चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी…

0
352

 

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीची हलचल वेग घेत असताना प्रभाग क्रमांक ७—कन्नमवार नगर, आशीर्वाद नगर आणि गणेश कॉलनी—याठिकाणी राजकीय समीकरणांचा वेगाने फेरबदल होत आहे. या प्रभागात एम.ए. शिक्षित सुवर्णा प्रसाद पवार यांचे नाव सध्या प्रबळ दावेदार म्हणून पुढे येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शहर विकास आघाडी या तीन पक्षांची युती झाल्यानंतर या आघाडीच्या ‘घडी’ या अधिकृत चिन्हावर सुवर्णा पवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

 

प्रसाद पवार यांच्या सामाजिक कार्याचा जनतेच्या विश्वासावर ठसा…

 

सुवर्णा पवार यांच्या लोकप्रियतेला अधिक बळ मिळत आहे ते त्यांच्या पती प्रसाद पवार यांच्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या उल्लेखनीय “माणुसकीचा घास” या सामाजिक उपक्रमामुळे महिला व बाल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना रोज विनामूल्य जेवण पुरवण्याचे पवार दाम्पत्याचे कार्य आज हजारो नागरिकांसाठी दिलासा बनले आहे.

 

रुग्णांच्या नातेवाईकांचे मत—

“अशा कठीण काळात जेवणाची चिंता दूर करणारा हा उपक्रम म्हणजे खरी माणुसकी. पवार दाम्पत्याने केलेली सेवा विसरण्यासारखी नाही.”

 

प्रभागातील महिलांमध्ये आणि युवकांमध्ये सुवर्णा पवार यांची वाढती लोकप्रियता…

 

कन्नमवार नगर, आशीर्वाद नगर आणि गणेश कॉलनीमध्ये नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान सुवर्णा पवार यांना महिलांचा, युवकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त समर्थन मिळाले.

महिला वर्गाचे म्हणणे आहे की “सुवर्णाताई शिक्षित, नम्र आणि आमच्यात मिसळून काम करणाऱ्या आहेत. स्थानिक प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे.”

 

दोन पक्षांच्या युतीनंतर समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली...

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिंदे शिवसेना या पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने प्रभाग क्रमांक ७ मधील समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

या युतीने सुवर्णा पवार यांच्या उमेदवारीला मजबूत राजकीय छत्र मिळाले असल्याचे मानले जात आहे.

“घडी चिन्हावर सुवर्णा पवार उतरल्याने प्रभाग ७ मध्ये लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यांची सामाजिक प्रतिमा आणि पतीचे सेवा कार्य हे मोठे बळ ठरणार आहे.”

 

स्थानिकांना बाहेरील उमेदवार नको — सुवर्णा पवार ठरू शकतात निर्णायक चेहरा…

 

या प्रभागात बाहेरील उमेदवार आणण्याची मागील काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र नागरिकांनी ठाम भूमिका घेत सांगितले की “आपल्या भागाशी नाळ जोडलेला, समस्या समजून घेणारा आणि इथेच राहणारा उमेदवार हवा. सुवर्णा पवार त्या सर्व बाबींना न्याय देतात.”

 

निवडणुकीची दिशाच बदलू शकते...

शैक्षणिक पात्रता, सामाजिक संपर्क, ‘माणुसकीचा घास’सारख्या उपक्रमामुळे जनतेमध्ये निर्माण झालेला विश्वास आणि तीन पक्षांच्या युतीचे राजकीय बळ यामुळे सुवर्णा पवार या प्रभाग क्रमांक ७ मधील निवडणुकीचे चित्र पूर्णत: बदलू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here