आरमोरी :
अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटना — ही भारतातील असंघटित रोजगार हमी कामगारांची एकमेव नोंदणीकृत संघटना (रजि. क्र. 5905/2024, ट्रेड युनियन अॅक्ट 1926 अंतर्गत) असून, या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अरुणजी गजभिये यांनी असंघटित कामगारांचे हक्क आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही संघटना स्थापन केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक बळकट करण्यासाठी श्री. नारायण बाबुराव धकाते यांची गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे श्रेय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अरुणजी गजभिये तसेच महाराष्ट्र कार्यकारिणी यांना दिले गेले.
या प्रसंगी हरीष मने, राकेश बेलसरे, राकेश बैस, संजय कुथे, मंगलसिंग मेश्राम, दीपक बारसागडे, नितिन मानापूरे, ज्ञानेश्वर कवासे, नंदु खानदेशकर, रघुनंदन जाळी, राजेंद्र दिवटे, अश्विन तितिरमारे, कमलेश धकाते, नरुभाऊ वझाडे, संजय मानकर, संजय बोरुळे, नंदकिशोर मने आणि अविनाश वरगंटीवार यांनी श्री. धकाते यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
