गडचिरोली:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांनी नवरात्र उत्सवानिमित्त गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील सार्वजनिक दुर्गा-शारदा उत्सव मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांवरील संकटे दूर होऊन त्यांना सुख-समृद्धी लाभावी, अशी मनोकामना दुर्गा-शारदा मातेकडे व्यक्त केली. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधिक बळ मिळावे, महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढण्याची प्रचंड शक्ती लाभावी, आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेला अधिक उभारी मिळावी, असे साकडे घातले.
या प्रसंगी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकुर, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडुरंग धानफोले, सुरेश मसराम तसेच शारदा-दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
