गडचिरोली:दिनांक एक जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने रेजिंग डे दर वर्षी साजरा केला जातो.या सप्ताहात जन जागृती रॅली, वाहतूक विभागाच्या वतीने वाहन व्यवस्था कशी असावी, दुचाकी चालवितांना हेल्मेट घालने, दारू पिऊन तसेच ट्रिपल सीट गाडी न चालविणे आणि कर्कश हॉर्न वाजवून ध्वनी प्रदुषण न करणे याच्यावर पथ नाट्य दाखवून लोकांना समज देण्यात आली होती.आज गडचिरोली शहरात मुख्य चारही मार्गांवर अनेक ठिकाणी झाडे लावून त्यांना नियमितपणे पाणी टाकून जगविण्याचा निर्धार सुध्दा आज वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आला आहे.
या वेळी वृक्ष रोपण कार्यक्रमात गडचिरोली पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी रेवचंद सिंगनजुडे आणि गडचिरोलीचे सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांच्या हस्ते वृक्ष रोपणाची सुरवात करण्यात आली, असून या कार्यक्रमात अतिरिक्त पोलिस निरीक्षक शरद मेश्राम ,वाहतूक पोलीस कर्मचारी जितेंद्र मारगाये, अमोल कोराम,सतीश मुंडे,रवींद्र लांजेवार,ईश्वर पोरेटी, नुतेश चांदेकर, विजय करमे,प्रशांत सोरते,शक्ती शेंडे, तथा महिला कर्मचारी छाया ठाकरे यांनी वृक्षरोपण कार्यक्रम सफल करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.