गडचिरोली: शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा वसंत विद्यालय चे सेवानिवृत्त शिक्षक तथा कर सल्लागार ॲड.संदीप धाईत यांचे वडील श्री भाऊराव विठोबा धाईत यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी चार वाजता निधन झाले आहे.
स्व.भाऊराव विठोबा धाईत यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
उद्या सकाळी नऊ वाजता कठानी नदीच्या तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहे.