राज्य मच्छिमार संघाच्या चेअरमनपदी विजय गिदी विराजमान….

0
143

मुंबई.दिनांक.3/2/2023

मुंबई.राज्य मच्छिमार संघाच्या चेअरमनपदी विजय गिदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या संघाच्या निवडणुकीत गिदी हे राखीव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गिदी यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.

विजय गिदी हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते असून,रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.त्यांच्या या निवडीचे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आ.जयंत पाटील,व्हाइस चेअरमन सुरेश खैरे यांच्यासह सर्व संचालक,अधिकारी,कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

माजी राज्यममंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ.पंडित पाटील,अलिबाग अर्बन बँक चेअरमन सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील,शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनीही गिदी यांचे अभिनंदन केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here