Home राजकीय माजी पालकमंत्री राजे आंब्रीशराव आत्राम यांच्याकडून नगराध्यक्षा प्रनोती निंबोरकर यांचा सत्कार; आगामी...

माजी पालकमंत्री राजे आंब्रीशराव आत्राम यांच्याकडून नगराध्यक्षा प्रनोती निंबोरकर यांचा सत्कार; आगामी वाटचालीस दिल्या शुभेच्छा…

0
294

 

गडचिरोली : शहराच्या नवनिर्वाचित भाजपाच्या नगराध्यक्षा प्रनोती सागर निंबोरकर यांचा माजी पालकमंत्री राजे आंब्रीशराव आत्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गडचिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या या सदिच्छा भेटीत आत्राम यांनी निंबोरकर यांचे अभिनंदन करत नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी प्रभावीपणे कार्य करावे, तसेच नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असा विश्वास व्यक्त केला. गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, नागरी सेवा आणि विकासकामांना प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रनोती निंबोरकर यांनी आत्राम यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करत, शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत आखाडे, नगरसेवक सागर निंबोरकर, मुक्तेश्वर काटवे, नगरसेविका गुड्डी मारबते, युवा नेते सोमेश्वर धकाते तसेच भारतीय जनता पक्ष चे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रनोती निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here