Home सामाजिक कॅन्सरग्रस्त रुग्णास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची आर्थिक मदत, मानवतेचा आदर्श : पुढील...

कॅन्सरग्रस्त रुग्णास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची आर्थिक मदत, मानवतेचा आदर्श : पुढील उपचारासाठीही मदतीचे आश्वासन…

0
86

 

गडचिरोली | प्रतिनिधी

दि. 30 जानेवारी 2026

चामोर्शी तालुक्यातील घोट येथील रहिवासी व व्यवसायाने वाहनचालक असलेले विजय पुल्लीवार (वय 40) हे गेल्या चार वर्षांपासून मुखरोग कॅन्सरने ग्रस्त असून सध्या गडचिरोली येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या आजाराची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये यांनी संघटनेच्या नेतृत्वाला दिली.

या माहितीची तात्काळ दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी रुग्णालयात सदिच्छा भेट देत रुग्णाची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या वतीने कॅन्सरग्रस्त रुग्ण विजय पुल्लीवार यांना आर्थिक मदत देण्यात आली.

तसेच, सिटी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत दुर्गे यांचीही भेट घेऊन रुग्णाच्या पुढील उपचाराबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. उपचारासाठी भविष्यात अधिक मदतीची आवश्यकता भासल्यास, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने पुढील उपचारासाठीही सहकार्य केले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, प्रवीण भाऊ गेडाम, तसेच संघटनेचे कार्यकर्ते विलास भाऊ वडेट्टीवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने गरजू रुग्णाच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून, मानवतेचे जिवंत उदाहरण या उपक्रमातून समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here