गडचिरोली येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) ५४ वे विदर्भ प्रांत अधिवेशन मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक ऊईके यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. अशोक ऊईके म्हणाले की, “देशाला प्रथम स्थानी ठेवून राष्ट्राचे यशस्वी नेतृत्व करणारी पिढी घडवण्याचे कार्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे. विद्यार्थ्यांनी ABVP कडून देशभक्तीचे, राष्ट्रसेवेचे संस्कार घ्यावेत आणि देशासाठी समर्पित भावनेने कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ABVP चे राष्ट्रीय महामंत्री विरेंद्रसिंह सोलंकी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी ABVP करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या मंचावर आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोविंद सारडा, डॉ. श्रीकांत पर्बत, देवशिष गोतकर, संगीत मस्के (नगर मंत्री) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शहर व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रमुख नेत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यामध्ये माजी आमदार डॉ. अशोक नेते (राष्ट्रीय महामंत्री, भाजपा एस.टी. मोर्चा), भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, गडचिरोली नगराध्यक्ष सौ. प्रणोती निंबोरकर, माजी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजपा शहर अध्यक्ष अनिल कुणघाडकर, तालुका अध्यक्ष दत्तू सुत्रपवार, माजी नगराध्यक्ष सौ. योगिता पिपरे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे आदी मान्यवरांचा समावेश होता.
विद्यार्थी, युवक व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या अधिवेशनामुळे गडचिरोलीत राष्ट्रभक्ती, संघटनशक्ती आणि सक्षम नेतृत्वनिर्मितीचा ठोस संदेश पोहोचला, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




