Home राजकीय नगरसेवक लिलाधर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत रक्तदान शिबीर व जनसंपर्क कार्यालयाचे भव्य...

नगरसेवक लिलाधर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत रक्तदान शिबीर व जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन…

0
107

 

गडचिरोली :

गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर लिलाधर सुधाकर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी गडचिरोली शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत भव्य रक्तदान शिबीर तसेच जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

रक्तदान शिबीर : ‘एक थेंब रक्त, हजारो आशा’…

लिलाधर भरडकर मित्र परिवाराच्या वतीने सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा सामाजिक संदेश देत नागरिकांमध्ये सामाजिक भान जागृत करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

नगरसेवक तथा इंजिनिअर लिलाधर भरडकर आणि नगरसेविका प्रतिभा अविनाश कुमरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यालयामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी, त्या तातडीने सोडवण्यासाठी तसेच नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक विश्वासार्ह केंद्र उपलब्ध होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे.

स्थळ : डोंगरे पेट्रोल पंपासमोर, पंचवटी नगर, चंद्रपूर रोड, गडचिरोली

वेळ : सकाळी 10 वाजल्यापासून

या सामाजिक उपक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक इंजिनिअर लिलाधर भरडकर आणि प्रतिभा कुमरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here