Home महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी सुहाना मंडलची निवड… वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी सुहाना मंडलची निवड… वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव…

0
168

 

गडचिरोली/मुंबई | १४ डिसेंबर — मुंबई येथील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आयोजित भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडू सुहाना सुनील मंडल हिने आपल्या कर्तृत्वाने विशेष लक्ष वेधून घेतले.

सुहाना ही इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सुभाषग्राम, ता. चामोशी, जि. गडचिरोली येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी असून तिची महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कमी वयातच दाखवलेल्या उत्कृष्ट खेळामुळे आणि शिस्तबद्ध सरावामुळे तिने हे यश संपादन केले आहे.

 

तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

 

सुहानाच्या या यशामुळे तिच्या शाळेसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगती अधोरेखित झाली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्याची प्रेरणा तिच्या यशामुळे निर्माण झाली आहे.

 

तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी संस्थेचे सचिव अब्दुल अमीर अब्दुल हकीम तसेच दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्ष शाहीन हकीम यांनी तिचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here