गडचिरोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ : प्रभागनिहाय आरक्षण जाहीर…

0
117

 

गडचिरोली :

गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रातील सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने एकूण १३ प्रभाग आणि २७ नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडत दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी नगरपरिषद सभागृहात पार पडली.

 

या सोडतीदरम्यान अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. सोडतीनुसार प्रत्येक प्रभागातील नगरसेवक पदे विविध प्रवर्गांसाठी खालीलप्रमाणे राखीव ठरली आहेत :

 

1️⃣ प्रभाग क्र. १ – महात्मा ज्योतिबा फुले वार्ड:

‘अ’ जागा – अनुसूचित जाती (महिला)

‘ब’ जागा – सर्वसाधारण

 

2️⃣ प्रभाग क्र. २ – लाजेडा:

अनुसूचित जमात आणि सर्वसाधारण (महिला)

 

3️⃣ प्रभाग क्र. ३ – स्नेहनगर:

नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण (महिला)

 

4️⃣ प्रभाग क्र. ४ – रामनगर:

अनुसूचित जमात (महिला) आणि सर्वसाधारण

 

5️⃣ प्रभाग क्र. ५ – छत्रपती शाहू नगर:

अनुसूचित जाती (महिला) आणि सर्वसाधारण

 

6️⃣ प्रभाग क्र. ६ – कॅम्प एरिया:

नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण (महिला)

 

7️⃣ प्रभाग क्र. ७ – गणेशनगर:

अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागासवर्ग (महिला)

 

8️⃣ प्रभाग क्र. ८ – महात्मा गांधी वार्ड:

नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण

 

9️⃣ प्रभाग क्र. ९ – हनुमान वार्ड:

नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण (महिला)

 

🔟 प्रभाग क्र. १० – विसापूर:

अनुसूचित जमात आणि सर्वसाधारण (महिला)

 

1️⃣1️⃣ प्रभाग क्र. ११ – सोनापूर:

अनुसूचित जमात (महिला) आणि सर्वसाधारण

 

1️⃣2️⃣ प्रभाग क्र. १२ – झाशी नगर:

नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण

 

1️⃣3️⃣ प्रभाग क्र. १३ – गोकुळनगर:

अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला)

 

या सोडतीनंतर आता गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने पुढील निवडणूक प्रक्रिया वेग घेणार आहे.

 

दरम्यान, या आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी कालावधी गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर ते मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत) असा ठेवण्यात आला आहे.

नागरिकांनी आपल्या हरकती अथवा सूचना नगरपरिषद कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here