गडचिरोली.(आष्टी)दिनांक.10/9/2022
चामोर्शि तालुक्यातील आष्टी येथून गोंडपिपरी मार्गाने जाणारी बस चौडमपल्ली,सिंगणपल्ली, चपराळा, चंदणखेडी, धन्नुर, मार्कंडा या परिसरातून जात होती, या बस मध्ये आष्टी परिसरातून गोंडपिपरी ला जाण्यासाठी, स्थानीक दुकानदार, भाजीपाला,दूध, दही विक्रेते,तसेच आपल्या महत्वाच्या कामांकरिता शेकडो लोकांचे आणि शालेय विद्यार्थ्यांचे येणे जाणे सुरू राहत होते.
परंतु एस टी डेपो अहेरी च्या अधिकाऱ्यांनी सदर बस मुलचेरा मार्गाने चालविल्याने या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे.
सदर आष्टी गोंडपिपरी मार्गाने जाणारी बस पूर्वी प्रमाणे चौडमपल्ली मार्गाने चालू करावी तसेच या मार्गावर जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एस टी महामंडळाच्या वतीने उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी आष्टी चे प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार यांनी आगार व्यवस्थापक अहेरी यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.