अरे बाप रे…आज पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू नरभक्षी वाघाच्या जबड्यात…

0
935

वाघाचा बंदोबस्त करण्यात वन विभागाची यंत्रणा सपशेल फेल…

गडचिरोली शहरापासून अवघ्या पंधरा किमी अंतरावर असलेल्या कळमटोला गावात आज एक 65 वर्षीय व्यक्तीला वाघाने शिकार केल्याची घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

वाघाच्या हल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव कृष्णा महागु ढोने वय 65 वर्ष असून, हा व्यक्ती आपल्या घरातील सरपण गोळा करण्याकरीता तो जंगलात गेला असता, दबा धरुन बसलेल्या वाघाने झडप घालून त्याला जागीच ठार केले होते. वन विभागाच्या वतीने वारंवार मनाई करण्यात आल्यानंतर सुध्दा,वाघाच्या वास्तव्य असलेल्या परिसरात गेल्यामुळे दुर्दैवाने आज पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आजच्या या घटनेमुळे अमिर्झा,कळमटोला गावातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

 या पूर्वी वाघाच्या हल्यात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे,तसेच अनेक ठिकाणी वन विभागाच्या विरोधात नागरिकांनी आक्रोश मोर्चा सुध्दा काढलेला होता परंतु वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाची यंत्रणा सपशेल फेल ठरल्याची विदारक परिस्थिती निर्माण झालेली असून,या पुढे अजून किती लोकांना वाघाच्या जबड्यात आपले प्राण गमवावे लागणार हे सुध्दा तपासणे गरजेचे आहे.

राज्य शासनाने कठोर निर्णय घेऊन वन विभागाच्या वतीने नरभक्षी वाघाचा बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा लोकांमध्ये होतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here