गढ़चिरोली (कॅंप) : गढ़चिरोली शहरातील कॅंप भागातील दुर्गा मंदिरात काल रात्री चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवाच्या मूर्ती व इतर धार्मिक साहित्य चोरले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून एक महिले सह चार आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून चोरी गेलेल्या काही मूर्ती खंडित अवस्थेत जप्त करण्यात आल्या आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव अंबादास गणेश नान्हे वय ३७ वर्ष राहणार मालेवाडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली,अनिता गणेश नान्हे वय ३५ वर्ष राहणार मालेवाडा तालुका , कुरखेडा जिल्हा गडचिरोली,योगेश शंकर गड्डमवार वय २५ वर्ष राहणार रांगी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली ,गोपाल अण्णा मेडपल्लीवार राहणार सिंगापूर तालुका सावली जिल्हा चंद्रपूर असून त्यांच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की,चार ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नागरिक व भक्तांनी आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.