शहरातील समस्या आठ दिवसात मार्गी लावण्याचा वंचित ने दिला अल्टिमेटम…

0
398

वंचित बहुजन आघाडीने मुख्याधिका-यांकडे केला शहर पंचनाम्याचा निवेदन सादर…

अन्यथा नगर परिषद कार्यालयाला ठोकणार कुलूप.

गडचिरोली.दिनांक 3/9/2022

वंचित बहुजन आघाडीच्या वतिने गडचिरोली शहर विकासाचा पंचनामा उपक्रम राबवून शहरातील अनेक समस्यांच्या अहवालाचे निवेदन वंचितच्या शिष्ठमंडळाद्वारे नगर परिषद मुख्याधिका-यांना देण्यात आले. शहरवासीय जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे, नगर परिषदेने सर्वे करून सर्व समस्या तात्काळ आठ दिवसात मार्गी लावण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली अन्यथा आठ दिवसानंतर नगर परिषद कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा ईशारा वंचितच्या शिष्ठमंडळाद्वारे देण्यात आला आहे.

शहराच्या समस्याच्या संदर्भात उपमुख्याधिकारी भांडारवार यांच्याशी वंचितच्या शिष्ठमंडळाने सविस्तर चर्चा करून विविध मागण्याचे निवेदन दिले .

मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली शहराच्या विकासासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यामातून हजारो कोटी रुपयाचा निधी नगर परिषदेला येतो परंतु ज्या ठेकेदाराकडून काम करवून घेतल्या जाते ते काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने त्याचा मोबदला म्हणून अलिखीत नियमानुसार संबंधीत अधिकारी व नगर परिषद पदाधिकारी परसेंटजच्या स्वरुपात पैसा घेत असल्याने इस्टिमेटनुसार काम करवून घेतल्या जात नाही त्यामूळे एकाच कामावरती वांरवांर शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च होतो त्यामूळे संबंधीत बांधकाम ठेकेदाराकडून परसेंटेज घेणे बंद करून ईस्टिमेटनूसार योग्य काम करवून घेण्यात यावे. शहरातील अनेक वार्डात रहदारीचे पक्के रस्ते नाहीत, चिखल व दगडमाती तुडवत नागरिकांना येणेजाणे करावे लागत आहे अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत , ज्या वार्डात रस्ते नाहीत तिथे नविन रस्ते बांधकाम करण्यात यावे व खड्डे पडलेल्या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. शहरातील अनेक वार्डातल्या नाल्या अर्धवट आहेत काही ठिकाणच्या नाल्या फुटलेल्या आहेत त्यामूळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन ते पाणी रस्त्यावर व खाली असलेल्या जागेत साचून राहून दुर्गंधी निर्माण होत आहे, त्यामूळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे , अशा सर्व ठिकाणाचे सर्वे करून जितक्या किमीचे रस्ते आहेत तितक्याच किमीच्या दुतर्फा नाल्या बनविण्यात यावेत व फुटलेल्या व अर्धवट नाल्याची दुरूस्ती करण्यात यावी.

शहरातील अनेक घराच्या मधोमध व घराच्या भिंतीला लागून विद्यतच्या जीवंत तारा गेल्या असल्याने वास्तव्य करणा-या नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामळे शहरातील संपूर्ण विद्युत अंडर ग्राऊंड करण्यात यावी.

शहरातील नळाच्या पाण्याची पाईप लाईन अनेक ठिकाणी फुटली असल्याने संपूर्ण शहर वासियांना पिण्याचे दुर्गंधीयुक्त गढूळ दूषीत पाणी नळाद्वारे येत आहे त्यामूळे त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी , प्रत्येक नागरिकांच्या नळाच्या पाण्याचे नमूने घेऊन तपासणी करीता लॅबमध्ये पाठवून पाणी पिण्यास योग्य आहे की नाही त्याची माहिती देण्यात यावी, सार्वजनिक विहीरी व हातपंपाच्या ठिकाणचे पाण्याचे नमूने घेऊन त्याची चाचणी करण्यात यावी व पाणी पिण्यास योग्य की अयोग्य असे फलक लावण्यात यावे, सार्वजनिक विहीरी व हातपंपाच्या ठिकाणी साप्ताहीक ब्लिचींग पावडर टाकण्यात यावे, नळधारकाच्या घरच्या पाण्याचे नमूने तपासणी करीता न घेता त्यांचे नांव नगर परिषदेच्या बुकात पाण्याचे नमूने घेतल्याची खोटी नोंद करण्यात आली आहे अशा कामचोर दिशाभूल करणा-या कर्मचा-यावर कठोर कारवाई करण्यात यावी .

पावसाळ्यात पडणा-या पाण्यामूळे शहराच्या बाहेरचे जंगलातील पाच किमी दूरवरचे पाणी विवेकानंदनगर येथे वाहत येते व संपूर्ण वार्ड वासियांच्या घरात शिरून राखरांगोळी करते त्यामूळे जंगलातून येणारे पाणी अडविण्याची उपाययोजना करण्यात यावी, तसेच गडचिरोली तलावातील पाणी ओवर फ्लो झाल्यानंतर मोठ्या नाल्याद्वारे बजाज शोरूम जवळून कठाणी नदिकडे वाहत जात होते परंतु नगर परिषदेकडे आधीच्या असणा-या नकाशातून तो नाला नगर परिषदेतल्या अधिका-यांनी लेआऊट टाकणा-या मालकाशी संगनमत करून गायब केला आहे त्यामूळे नाल्याद्वारे जाणारे पाणी अस्तव्यस्त होऊन अनमोल नगर वासीयांच्या घरात शिरून मोठ्या प्रमाणात नासधूस करते याला जबाबदार असणा-या अधिकारी व लेआऊट मालकांवर कारवाई करून नाला जैसे थे स्थितीत करण्यात यावे.

शहरातील पडलेल्या घरांचे , झोपडी बांधून राहणा-यांचे व कच्चे बांधकाम असणा-या घरांचे सर्वे करून दुर्बल घटकातील नागरिकांना विनाअट घरकुल योजना मंजूर करून लाभ देण्यात यावे. फुटपाथ धारकांना हाकर्स झोनच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यात यावे व नगर परिषदेने तयार केलेल्या दुकान गाळ्यात कमी दरात गाळे उपलब्ध करून देण्यात यावे.

नगर परिषदेने वाढविलेले घरटॅक्स कमी करण्यात यावे व घरटॅक्स उशिरा भरणा-याकडून प्रत्येक महिण्याला दोन टक्के दराने भुर्दंड घेतल्या जाते ते माफ करण्यात यावे व नळाचे मिटरचे रेट किती रुपये युनिट प्रमाणे राहणार आहे ते जाहिर करण्यात यावे व नंतरच मिटर रिडींग घेण्यात यावी.

शहरातील अतिक्रमणाच्या संबंधाने वन समित्यांचे मंजूरीचे ठराव घेऊन शासन मान्यता मिळवून देऊन अतिक्रमण धारकांना तात्काळ घराच्या जागेचे पट्टे देण्यात यावे. शहरातील सिटी सर्वेचे काम त्वरीत सुरू करून अतिक्रमण धारकांसहीत सर्वांना प्रापर्टी देण्यात यावे.

आदिवासी समाजाचे प्रतिक असलेल्या गोटूलवर ( आदिवासी समाज सांस्कृतिक भवन गडचिरोली ) नगर परिषदेने केलेले अतिक्रमण तात्काळ हटवून गोटूलची ईमारत आदिवासी बांधवांच्या ताब्यात देण्यात यावी. शहरातील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करून लहान मुलांना खेळण्याकरीता व वयोवृद्धांना विरंगुळ्याकरीता सुविधा निर्माण करून देण्यात याव्यात व ओपन स्पेसच्या संगोपन व देखभालीकरीता चौकिदाराची नेमणूक करण्यात यावी.

शहरातील प्रमुख रस्त्यावर व प्रत्येक वार्डात सुलभ शौचालयाची निर्मीती करून देखभालीकरीता चौकिदाराची नेमणूक करण्यात यावी. शहरातील आरोग्याची समस्या लक्षात घेऊन नगर परिषदेने स्वत:चा प्रशस्त आधूनिक सोयी सुविधायुक्त दवाखाण्याची निर्मीती करण्यात यावी.

नगर परिषदेतल्या सर्व शाळेत विनामुल्य कान्व्हेंट सुरू करून ईंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात यावे व किमान दहावी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी व नगर परिषदेतल्या शाळेतून शिक्षण घेऊन पुढे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वत: नगर परिषदेद्वारे करण्यात यावे.

स्वर्गरथ शहरवासियांना विनामुल्य देण्यात यावे व पैसे घेणा-या वाहक व चालकांवर कारवाई करण्यात यावी. घंटागाडी करीता लावलेले बार कोड एक्टीव्ह नसल्याने संबंधीत कंपनीला दिलेले कोट्यवधी रुपये परत घेण्यात यावे.शहरातील मुख्य रस्त्यावरच्या चौका चौकात शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज , बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले , मौलाना अब्दुल कलाम आदि महामानवांच्या पुतळ्याची निर्मीती करण्यात यावी.

शहरातील मोकाट जनावरे, डूकर, कुत्रे यांचा बंदोबस्त करण्यात यावा व जे नागरीक पाळीव कुत्रे पाळून सार्वजनिक रस्त्यावर विष्ठा करायला लावतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आदि मागण्याचे निवेदन देण्यात आले.

सर्व समस्याच्या संदर्भाने सर्वे करून आठ दिवसाच्या आत सर्व समस्या तात्काळ मार्गी लावून शहरवासियांना होणा-या त्रासातून मूक्त करण्यात यावे अन्यथा नगर परिषद कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

समस्यांच्या पंचनाम्याच्या अहवालाचे निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील शिष्ठमंडळात महिला नेत्या मालाताई भजगवळी, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महासचिव योगेंद्र बांगरे, बाशिद शेख , भोजूभाऊ रामटेके, तुळशिराम हजारे, भारत रायपूरे, निखील वाकडे, मनोहर कुळमेथे, विश्वनाथ बोदलकर, जावेद शेख, शंकर गायकवाड आदिंचा समावेश होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here