निवडणूक अधिकारी प्रस्थापित भांडवलदारांच्या बाजूने कार्य करीत असल्याची शंका…
Gadchiroli district highlights..
गडचिरोली : मागील तीस वर्षांनंतर प्रथमच विरोधी गट आमनेसामने येवून होत असलेल्या गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे वातावरण गरम व्हायला लागले असून सेवा सहकारी संस्थेच्या मतदारांना देव दर्शनाचे आणि रोख रकमेची लालूच दाखवून पळवापळवी सुरू झाली आहे.
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना एका अधिकाऱ्याकडून झालेले मारहाण प्रकरण ताजे असतानाच आता गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप, काॅग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचे गट आपआपल्या संपर्कातील मतदारांना देवदर्शनाचे आणि रोख रकमेची लालूच दाखविणे सुरू केले असल्याची जोरदार चर्चा असून आज पोर्ला परिसरातील मतदारांना शेगाव ला नेण्यासाठी एका गटाने मोठी जमवाजमव केली असल्याची माहिती आहे.
या प्रकारामुळे तीनही गटांमध्ये घमासान निर्माण होण्याची शक्यता असून प्रसंगी पडवा पडवी, अडवा अडवी, आणि प्रसंगी मारामारी होण्याची परिस्थिती निर्माण होवू शकते, असे जाणकारांनी आपले मत व्यक्त केले आहे.
या पाश्र्वभूमीवर सहकारी निवडणूक विभाग आणि पोलिस विभाग वेळीच सावध होवून मतदारांना सुरक्षितता देण्यासाठी उपाययोजना न केल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान मोठ्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसून येत आहे. एकुणच गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक तणावाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.