Home ब्रेकिंग न्यूज महाधुंद कारचालकाचा वाहतूक पोलिसाला उडवण्याचा प्रयत्न; गडचिरोलीत थरारक घटना…

महाधुंद कारचालकाचा वाहतूक पोलिसाला उडवण्याचा प्रयत्न; गडचिरोलीत थरारक घटना…

0
472

 

गडचिरोली, प्रतिनिधी :
शहरातील आयटीआय चौक परिसरात मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहन चालवणाऱ्या बेदरकार चालकामुळे मोठा अपघात घडण्याची भीती निर्माण झाली. मद्यप्राशन करून वेगाने वाहन चालवत असलेल्या चालकाने दुसऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. आशीष श्रीवास्तव (वाहन क्रमांक एमएच 33 एसी 5101) हा चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या धडकेत एमएच 33 एडी 4991 या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याची नोंद नाही.

अपघातानंतर संबंधित चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत इंदिरा गांधी चौक परिसरात त्याला अडवले. यावेळी मद्यधुंद चालकाने थेट वाहतूक पोलिसालाच वाहनाने उडवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

पोलिसांनी चालकाची वैद्यकीय तपासणी करून त्याने मद्यप्राशन केल्याची खात्री केली असून त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा व इतर संबंधित कलमान्वये कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या मद्यधुंद वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, अशा बेदरकार वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, रात्रीच्या वेळेत नाकाबंदी व तपासणी अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी जोरदार मागणी शहरवासीयांकडून होत आहे. मद्यधुंद वाहनचालकांवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही, तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here