Home राजकीय मुलाखतीला न गेलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचा प्रयत्न?  ‘रेडीमेड’ उमेदवारीचा नवा खेळ उघड!

मुलाखतीला न गेलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचा प्रयत्न?  ‘रेडीमेड’ उमेदवारीचा नवा खेळ उघड!

0
800

 

गडचिरोली :
भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. मात्र, आश्चर्य म्हणजे या मुलाखतीला अनुपस्थित राहिलेल्या एका महिला उमेदवाराला उमेदवारी मिळवून देण्यासाठी एक मोठ्या कक्षात बसणाऱ्या व्यक्तीच्या नेतृत्वाखालील गटाने थेट मोहीम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली असून, भाजपमध्ये ‘रेडीमेड उमेदवारी’चा नवा ट्रेंड सुरू झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

संबंधित महिला उमेदवार या उच्च शिक्षित असून, मोठ्या पदावर कार्यरत होत्या. परंतु आता त्या राजकारणात उतरून थेट नगराध्यक्ष पदावर दावा सांगत आहेत. “जर राजकारण करायचेच होते, तर उच्च शिक्षण घेऊन नोकरी करण्याची काय गरज होती? त्या जागेवर एखाद्या गरीब युवकाला नोकरी मिळाली असती, तर त्याच्या आयुष्यात प्रकाश पडला असता,” अशी टीका कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर केली जात आहे.

नवोदय मित्राचा प्रभाव?

माहितीनुसार, ही महिला उमेदवार एका मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनाशी निगडित असलेल्या नवोदय मित्राची जवळची असल्याने त्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याची चर्चा आहे. जिल्हा आणि शहर कोर कमिटीचे प्रमुख पद सांभाळणाऱ्या वरिष्ठ नेत्यांना या संपूर्ण प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आल्यानेही नाराजी वाढली आहे.
“पक्षातील महत्त्वाचे निर्णय काही मोजक्या व्यक्तींच्या गटात घेतले जात आहेत. कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली जात नाहीत,” असा आरोप जिल्हा भाजपच्या गोटातून ऐकायला मिळतो.

काँग्रेसकडून बलाढ्य उमेदवार, तरी भाजपकडून गोंधळाचे राजकारण!

दुसरीकडे, काँग्रेसकडून बलाढ्य उमेदवार मैदानात उतरविण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यानंतरही भाजपकडून अशा प्रकारचा गोंधळ होईल, अशी अपेक्षा कोणी केली नव्हती. ज्यांनी भाजपसाठी अहोरात्र परिश्रम घेतले, प्रचारात जीव ओतला, तेच आता बाजूला पडले आहेत.
“गुरु गुड आणि चेला साखर” अशी म्हण या परिस्थितीला तंतोतंत लागू पडते, असे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.

मुलाखत चुकवली, पण उमेदवारी पक्की!
भाजपमध्ये ‘रेडीमेड’ उमेदवारीचा नवा खेळ; कार्यकर्त्यांत संतापाचा सूर.

भाजपमध्ये गटबाजीचा उद्रेक! कक्षातल्या गटाकडून ‘रेडीमेड’ उमेदवारीचा प्रयोग शहरात चर्चेचा विषय!

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी मुलाखतीला न गेलेल्या महिला उमेदवाराला उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येताच पक्षातील असंतोष उफाळला आहे.
मुलाखतीचा सगळा कार्यक्रम पक्ष कार्यालयात पार पडला, पण मुख्य दावेदार उमेदवार तिथेच नव्हत्या. तरीदेखील त्यांचे नाव ‘रेडीमेड उमेदवार’ म्हणून पुढे करण्यात आल्याने अनेक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

जिल्हा कोर कमिटीतील सदस्यांची नाराजी…

जिल्हा आणि शहर कोर कमिटीचे वरिष्ठ सदस्य, माजी खासदार, तसेच दीर्घकाळ पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी न करून घेतल्याने भाजपमध्ये गटबाजीचा उद्रेक झाला आहे.
“भाजपमध्ये आता विचार आणि कार्यकर्त्यांची किंमत उरली नाही, फक्त संपर्कवाल्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” अशी प्रतिक्रिया काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी दिली आहे.

‘संपर्क’ आणि ‘शिक्षण’ हेच राजकारणाचे नवे मापदंड?

उच्च शिक्षण, मोठी नोकरी, मोठे संपर्क आणि  गटसंबंध – या चौकटीतूनच आता उमेदवारीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप पक्षातीलच काही नेत्यांकडून होत आहे.
“राजकारणात येण्यासाठी शिक्षण नव्हे तर जनसेवा आवश्यक आहे. पण येथे शिक्षण आणि संपर्काच्या जोरावर उमेदवारी मिळविण्याचा प्रकार सुरू आहे,” असे एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचे मत आहे.

भाजपमध्ये गटबाजी, कार्यकर्त्यांची नाराजी!
मुलाखतीला गैरहजर उमेदवाराला थेट उमेदवारी देण्याचा प्रयत्न..? शहरात चर्चेचा विषय!

‘गुरु गुड, चेला साखर’ — भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवारीवरून राजकीय वादाचा भडका!

भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवार निवड प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुलाखतीला न गेलेल्या उमेदवाराला मोठ्या नेतृत्वाखाली उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याने कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
गडचिरोली शहरात या घटनेमुळे भाजपच्या संघटनेतील शिस्त आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

“कार्यकर्ते झटतायत, पण निर्णय काही मोजक्यांच्या हातात”

भाजपच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महिनोनमहिने मेहनत घेतली. तरीदेखील काही मोजक्या व्यक्तींच्या गटाने मोठ्या संपर्काच्या जोरावर आपले नाव पुढे करणे, ही कार्यकर्त्यांवरील अन्यायाची परिसीमा असल्याचे म्हटले जात आहे.
“ज्यांनी आम्हाला राजकारण शिकवले, तेच आता आमच्याकडून शिकवून घेत आहेत,” असा कटाक्ष काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हाणला आहे.

शहरात वाढलेले राजकीय तापमान…

काँग्रेसकडून बलाढ्य उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपकडून आलेल्या या बातमीने शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. नागरिकांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे की, ‘भाजपमध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळतो का?’
आगामी निवडणुकीत या असंतोषाचा परिणाम मतदानपेटीत उमटणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here