Home राजकीय गडचिरोली, आरमोरी, वडसा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 137 अर्ज दाखल; मुलाखतींना उसळलेले वातावरण…

गडचिरोली, आरमोरी, वडसा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 137 अर्ज दाखल; मुलाखतींना उसळलेले वातावरण…

0
634

 

 

गडचिरोली :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून गडचिरोली, आरमोरी आणि वडसा नगरपरिषदेसाठी उमेदवार होण्याच्या इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

 

जिल्ह्यातून एकूण १३७ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी गडचिरोलीसाठी नगराध्यक्ष पदासाठी २ आणि नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज,

 

आरमोरीसाठी नगराध्यक्ष पदासाठी ३ व नगरसेवक पदासाठी ५० अर्ज,

 

वडसासाठी नगराध्यक्ष पदासाठी ३ आणि नगरसेवक पदासाठी ४२ अर्ज आले आहेत.या सर्व इच्छुकांची मुलाखत जिल्हा काँग्रेस कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हा निवड मंडळाच्या उपस्थितीत पार पडली.

या वेळी जिल्हा निरीक्षक सचिन नाईक, आमदार रामदास मसाराम, निरीक्षक संदेश सिंगलकर, संतोष रावत, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, अजय कंकडलावार, हनुमंतू मडावी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, सेवादल जिल्हाध्यक्ष राजू गारोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

विशेष म्हणजे विवेकानंद नगरचे प्रमुख दावेदार राकेश रत्नावार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करून लक्ष वेधून घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here