नासिक.date 13/9/2022
आम आदमी पार्टी नासिककडून महानगरपालिका रस्ते दुरस्तीसाठी अनोखे *500 में बिक जाओगे, तो ऐसा ही रस्ता पाओगे”* पेठ रोड या ठिकांणच्या रस्त्यावर असे अनोखे जनजागृती आंदोलन करण्यात आले, रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे आम आदमी पार्टीच्यां कार्यकर्त्यांकडून स्लोगन गावुन प्रबोधन करण्यात आले.
आज आपण सर्वच निवडणुकीची दिशा बघितली तर भ्रष्ट राजकारणी गरीब लोकांना भुलवून त्यांना पैसे, दारू, पार्टी देऊन स्वताला मतदान करण्यास भाग पाडतात त्यामुळे आज लोकशाही धोक्यात आली आहे, त्यामुळे आज प्रामाणिक, कर्तुत्ववान होतकरू शिकलेल्या तरुण निवडून न येण्यामागे अशी अनेक कारणे, जबाबदार आहेत, ही आज देशाची एक प्रकारे मोठी समस्याच बनली आहे, पैसे घेऊन मतदान करू नये असे आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून तळमळीने लोकांना सांगण्यात आले.
तुम्हीच तुमचे मत जर पाचशे रुपयात विकले तर पाच वर्ष तुम्ही भ्रष्ट राजकारणांना प्रश्न करू शकत नाहीत, कारण तुम्ही त्यांच्या नजरेत विकले गेलेले आहात, त्यामुळे प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होत नाही, त्यामुळे आपल्या प्रभागाचा विकास आपल्यांपासुन कोसो दूर चालला जातो.
नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते लवकरात लवकर दुरस्त व्हावेत हा मुख्य हेतु या आन्दोलनाचा होता.
ह्या प्रसंगी आम आदमी पार्टीचे मध्य विधानसभा अध्यक्ष ऎड. प्रभाकर वायचळे, नाशिक-देवळाली विधानसभा अध्यक्ष गिरीष उगले पाटिल, पूर्व विधानसभा अध्यक्ष योगेश कापसे, पदाधिकारी माजीद पठान, स्वप्निल घिया
दिपक सरोदे प्रकाश कनोजे, प्रदीप लोखंडे,मेघराज भोसले,अमर गांगुर्डे, ललित कुंभारकर, अनिल कौशिक साहिल सिंग आणि चंदन पवार उपस्थित होते