प्रबोधन….
जगातले, सर्व धर्म आणि पंथ, समाजातील पीडीतांच्या मदतीला धाऊन जाण्याची शिकवण देतात. गरजवंताच्या मदतीला धाऊन जाणे, संकटाच्या काळात संकटग्रस्ताच्या मागे खंबीरपणे ऊभे रहाणे, तहानलेल्याला पाणी पाजणे, भुकेलेल्याला अन्न देणे.आजारी माणसाची सेवा करणे, अपघात ग्रस्ताच्यामदतीला धाऊन जाणे , हा मानवता धर्म आहे. तो सर्वांनी निभवावा असे,धर्मगुरु, किर्तनकार,.प्रवचनकार, आदी विचारवंत, लोकसेवक आपल्याला ऊपदेश करीत असतात.
त्याप्रमाणे आपण, मानवता धर्म निभावण्याचा ज्याच्या त्याच्या परिने प्रयत्न करीत असतो. तो तसा करायला च हवा, पण ज्याला आपण मदत करतो, ज्याच्या मदतीला आपण धाऊन जातो, तो खरोखर मदत घेण्याच्या लायक आहे का, हेसुद्धा पारखून घेणे गरजेचे असते.
केंद्र शासन मोफत धान्य देण्याची कल्याणकारी योजना राबवित आहे. खरोखर या योजनेची आवष्यकता आहे कां. ? आभ्यासकांच्या मते मोफत धान्य दिलै जात आसल्याने लोकात ऐत खाऊपणा वाढला आहे. काम न करण्याची प्रवृती बळावत आहे. कामाला मजुर मिळेनासा झाला आहे.
खरच मोफत धान्य द्यायचे असेल तर ते, अंध, अपंग भिकार्यांना द्यायला हवे.मोफत धान्य घेणारे अनेक लोक धान्य विकून दारु ढोसलत बसतात. आसाही सांगोवा आहे.
तेव्हा मदत करतांना, मदतीला धाऊन जाताना आपण सुयोग्य गरजवंतालाच मदत करित आहोत याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.


