Home शैक्षणिक इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूलमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा संविधानिक मूल्यांचा...

इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूलमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा संविधानिक मूल्यांचा जागर; विद्यार्थ्यांना हक्क व कर्तव्यांचे मार्गदर्शन…

0
72

 

 

गडचिरोली :

इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे माननीय प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माननीय प्राचार्य बी. जे. वेपारी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करत भारतीय संविधानाने अल्पसंख्याक समाजाला दिलेले हक्क, अधिकार व संरक्षण यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. समाजातील सर्व घटकांनी परस्पर सन्मान, सामाजिक सलोखा, समता व बंधुभाव जपण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

 

या प्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक केळझरकर सर, मुजुमदार सर तसेच इतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अल्पसंख्याक हक्कांचे महत्त्व, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता आणि संविधानिक मूल्ये याबाबत त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले. संविधानाचा आदर राखून जबाबदार नागरिक घडणे हीच खरी लोकशाहीची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हलदार मॅडम यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन खराते सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here