Home ब्रेकिंग न्यूज आशीर्वाद नगरात खुशबू रणदिवे यांच्या नावावर जनतेचा विश्वास — जनसमर्थनात झपाट्याने वाढ!

आशीर्वाद नगरात खुशबू रणदिवे यांच्या नावावर जनतेचा विश्वास — जनसमर्थनात झपाट्याने वाढ!

0
695

 

गडचिरोली ::

गडचिरोली नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ७ आशीर्वाद नगर येथे सौ. खुशबू मंगेश रणदिवे यांच्या नावाभोवती जोरदार चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात घराघरात, चौकाचौकात खुशबू रणदिवे यांच्या कार्याचा आणि त्यांच्या संभाव्य उमेदवारीचा विषय चर्चेचा ठरला आहे.

 

कॅम्प एरिया, गोकुळनगर आणि आशीर्वाद नगर परिसरात नुकत्याच झालेल्या दौऱ्यात नागरिकांकडून त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला. उच्च शिक्षण घेतलेली, नम्र स्वभावाची आणि सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारी अशी खुशबू मंगेश रणदिवे यांची ओळख निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी स्थानिक जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

 

स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले की  “खुशबू रणदिवे आमच्या भागात नेहमी उपलब्ध असतात. कोणतीही अडचण आली की त्या तत्काळ मदतीस धाव घेतात. त्यांच्या रूपाने आमच्याकडे एक सक्षम महिला नेतृत्व तयार होत आहे.”

 

या जनतेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे खुशबू रणदिवे यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली असून, भाजपकडून प्रभाग क्रमांक ७ मध्ये त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

 

भाजपमधील अनेक कार्यकर्ते, महिला आणि युवक-युवती वर्गाने खुशबू रणदिवे यांना सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. शेकडो कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात स्वयंस्फूर्तीने उतरले असून, आशीर्वाद नगरात भाजपचा झेंडा खुशबू रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

 

 “जर भाजपने खुशबू रणदिवे यांना उमेदवारी नाकारली, तर युवकांचा आक्रोश आणि नाराजी पक्षासाठी नुकसानदायक ठरू शकतो.”

 

कारण, विरोधी पक्षांकडून देखील या प्रभागात बलाढ्य उमेदवार उभा राहण्याची शक्यता असल्याने निवडणुकीची लढत अधिक चुरशीची होणार आहे.

 

खुशबू रणदिवे यांचे वाढते जनाधार, महिलांमधील प्रभाव, आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ — आशीर्वाद नगरात भाजपच्या विजयाचे समीकरण खुशबू रणदिवे यांच्या नावाशी जोडले जात असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here